Trending

Pm Kisan Yojana:- महाराष्ट्रासह देशातील ‘या’ राज्यांमध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळते 12 हजाराची मदत

Pm Kisan Yojana:- महाराष्ट्रासह देशातील ‘या’ राज्यांमध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळते 12 हजाराची मदत

Pm Kisan Yojana:- महाराष्ट्रासह देशातील ‘या’ राज्यांमध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळते 12 हजाराची मदत

 

Pm Kisan Yojana : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. यामुळे देशातील बहुसंख्य लोकांच्या उत्थानासाठी आणि शेती क्षेत्राच्या कल्याणासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत

स्वातंत्र्योत्तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध निर्णय घेतले गेले आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये पीएम किसान योजनेचा देखील समावेश होतो.

या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. पण हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकरकमी मिळत नाहीत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांना मिळतो

सरकारची मोठी घोषणा, सर्वांचे वीज बिल माफ.वीज बील यादीत नाव पहा.

यानुसार योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 15 हप्ते मिळाले आहेत. पंधरावा हप्ता पंधरा नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना सोळाव्या हफ्त्याचे वेध लागले आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 6,000 ऐवजी 12 हजाराची रक्कम दिली जात आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा देखील समावेश होतो

राज्यातील शेतकऱ्यांना मिळतात 12000

 • खरे तर, पीएम किसान योजनेची लोकप्रियता पाहता राज्यातील शिंदे सरकारने या योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे.
 • या राज्याच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अतिरिक्त 6,000 रुपये मिळत आहेत.
 • म्हणजेच केंद्राच्या पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार आणि राज्याच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 असे एकूण 12 हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जात आहेत.
 • जें शेतकरी पीएम किसानसाठी पात्र आहेत त्यांनाच मात्र हा लाभ मिळत आहे.
 • नमो शेतकरीचा पहिला हप्ता हा नुकत्याच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
 • याचा दुसरा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असा अंदाज आहे.

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

मध्यप्रदेश मधील शेतकऱ्यांनाही मिळते अधिकची रक्कम

 • महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेश राज्यातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना देखील अधिकची रक्कम दिली जात आहे.
 • एमपीमध्ये तेथील शिवराज सिंग चौहान सरकारने किसान कल्याण स्कीम लागू केली आहे.
 • या योजनेअंतर्गत चार हजार रुपयाची रक्कम तेथील शेतकऱ्यांना दिली जात आहे.
 • म्हणजे पीएम किसानचे सहा हजार आणि किसान कल्याणचे 4,000 असे एकूण दहा हजार रुपये तेथील पीएम किसानच्या पात्र शेतकऱ्यांना मिळत आहेत.
 • विशेष म्हणजे शिवराज सिंग चौहान यांनी किसान कल्याणची रक्कम 6000 करण्याची घोषणा केली आहे.
 • याचाच अर्थ आगामी काही दिवसात तेथील शेतकऱ्यांना देखील बारा हजार रुपये मिळणार आहेत

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button