Trending

Cotton Future Rate : साठवलेल्या कापसाने सुटलीय खाज, एप्रिलमध्ये चढेल का दरवाढीचा साज

Cotton Future Rate : साठवलेल्या कापसाने सुटलीय खाज, एप्रिलमध्ये चढेल का दरवाढीचा साज

Cotton Future Rate : कापूस भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कापसाचे भाव कसे असतील? जाणून घेऊ या सविस्तर.
सध्या बाजारांत कापसाचे कमीत कमी दर हे साडेपाच हजारांच्या तर सरासरी दर सहा हजारांच्या आसपास असल्याचे दिसून येत आहे. यंदा कापसाचा ७ हजार २० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर झाला आहे.

भविष्यात

कापूस

अनेकांनी भविष्यात भाव वाढतील या आशेने घरात कापूस साठवून ठेवला, पण आता या साठवलेल्या कापसाला बारीक कीड लागत असून त्यामुळे शेतकऱ्याच्या घरातील सदस्यांना त्वचारोग, अॅलर्जी अशा आजारांना सामोरे जावे लागतेय. त्यामुळे नाईलाजाने कमी भावात शेतकरी कापूस विकताना दिसत आहेत. मात्र ज्यांच्याकडे कापूस साठविण्याची चांगली सोय आहे, अशा शेतकऱ्यांना भविष्यात भाव वाढण्याची अपेक्षा आहे. Cotton Future Rate

शेतकऱ्यांनो आता या अॅपद्वारे करा सिंचन विहिरीसाठी नोंदणी; लगेच खात्यात येतील 4 लाख

साठवलेला कापूस खाणार का भाव ?
एप्रिल ते जून दरम्यान कापसाचे भाव किती असतील याचा अंदाज कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्ष, पुणे यांनी वर्तविला आहे. या विभागातर्फे दर आठवड्याला बाजार माहितीचे अंदाज आणि विश्लेषण केले जाते. (त्यासंदर्भातील संपर्क क्रमांक तळाशी दिलेला आहे.)

आयात निर्यातीचा कल असा आहे
कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे जे ‘व्हाइट-गोल्ड’ म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी 25% वाट भारताचा आहे आहे. राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत, मागील वर्षाच्या तुलनेत 2022-23 मध्ये आयातीत 55% वाढ आणि निर्यातीत 23% घट होण्याचा अंदाज आहे. हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षीच्या तुलनेत आयातीत 3.84% वाढ आणि निर्यातीत 1.81% घट झाली आहे. Cotton Future Rate

✅‘या’ दिवशी जमा होणार 16 वा हप्ता; 16 व्या हफ्त्यापासून जमा होणार तब्बल 12 हजार रुपये

यंदाचे कापूस उत्पादन असे असेलगेल्या वर्षी 14 वर्षांमधील नीचांकी उत्पादनावर गेल्यानंतर, भारतातील कापूस पीक 337 लाख गाठी म्हणजे गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत 26 लाख गाठींनी जास्त असल्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात बाजारात कापसाची आवक गतवर्षीप्रमाणेच असल्याचे दिसून येत आहे.Cotton Future Rate

2023-24 मध्ये जागतिक कापूस उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत किरकोळ वाढण्याची अपेक्षा आहे (0.5 टक्के किंवा 600,000 गाठी) ते 115.0 दशलक्ष गाठी युनायटेड स्टेट्समध्ये जास्त उत्पादनाची अपेक्षा तसेच चीन, तुर्कस्तान आणि पाकिस्तान मध्ये कमी उत्पादनाचा अंदाज आहे. (स्रोतः USDA-Cotton Outlook)

सरकार नियोजित मध्यमवर्गीय गृहनिर्माण योजनेसाठी निवडक लाभार्थींसाठी उत्पन्नाचे मानक, ठिकाणे आणि निवासाचे प्रकार निर्दिष्ट करेल

बाजारपेठेत कापसाचे भाव
कापूस दराचा आढावाअकोला बाजारपेठेत कापसाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत.
मागील तीन वर्षातील एप्रिल ते जून या कालावधीतील कापसाच्या किमती पुढील प्रमाणे-
एप्रिल ते जून २०२१ – रु

६,८२४ प्रति क्विंटल

एप्रिल ते जून २०२२ रु

११,६१८ प्रति क्विंटल

एप्रिल ते जून २०२३ – रु ७,९८३ प्रति क्विंटल

बँक ऑफ महाराष्ट्र कडून मिळणार कोणत्याही अटीशिवाय तात्काळ 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज

भविष्यातील किंमतीचा अंदाजवरील प्रमाणे उत्पादन आणि आयात-निर्यात या माहितीवरून पुणे येथील बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षातील तज्ज्ञांनी कापसाचा एप्रिल ते जून महिन्याचा अंदाज दिला आहे. त्यानुसार एप्रिल ते जून २०२४ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे रु. ७,००० ते ८,००० प्रति क्विंटल अशा राहण्याची शक्यता आहे. Cotton Future Rate

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button