Trending

Chulha Desi Jugad : जुगाडपासून बनवला अप्रतिम स्टोव्ह, थंड पाणी टाकल्यावर बाहेर पडते गरम पाणी

Chulha Desi Jugad : जुगाडपासून बनवला अप्रतिम स्टोव्ह, थंड पाणी टाकल्यावर बाहेर पडते गरम पाणी

 

Chulha Desi Jugad : भारतीय लोकं जुगाड करण्याच्या बाबतीत अव्वल आहेत. आपण असे असे जुगाड शोधून काढतो ज्याबद्दल विदेशी माणसं स्वप्नातही विचार करू शकत नाही. असाच एक अवाक् करणारा जुगाड सध्या चर्चेत आहे. गावकऱ्यांनी अशी एक चूल तयार केलीये ज्यावर एकाच वेळी तुम्ही दोन कामं करू शकता. भाकरी भाजता भाजता त्याच आगीवर पाणी सुद्धा गरम करू शकता. बरं, जुगाड करताना असं डोकं लावलंय की, पाणी गरम करण्यासाठी तुम्हाला चुलीवरचं पहिलं भांडं बाजूला ठेवण्याची गरज नाही. चला तर मग पाहूया गावकऱ्यांनी इंधन बचाव चूल तयार केली तरी कशी?Chulha Desi Jugad

Pm Kisan Mandhan Scheme

गावकऱ्यांनी कसा केला जुगाड

 

सर्वात आधी पत्र्याचा डबा घेतला. या डब्याला कापून त्याला दोन नळकांडी बसवली. यातील पहिलं नळकांडं पाणी ओतण्यासाठी वापरलं जातंय तर दुसरं गरम झालेलं पाणी बाहेर निघण्यासाठी. या डब्याच्या मधोमध लाकडं सारण्यासाठी जागा आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या चुलीवर भाकरी आणि पाणी एकाच वेळी गरम केलं जातंय. हा जुगाडू व्हिडीओ या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा जुगाड ९६ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या चूलीचं कौतुक केलंय. कारण ही चूल अशी आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही कमीत कमी लाकडं जाळून जास्तीत जास्त आग निर्माण करू शकता.Chulha Desi Jugad

Pm Kisan Mandhan Scheme

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button