काय सांगता ! ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेलची गरजच नाही ;

Tractor Run On Cow Dung काय सांगता ! ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेलची गरजच नाही ;

गाईच्या शेणाने चालवता येणार ट्रॅक्टर, ‘या’ कंपनीने केलं हे भन्नाट संशोधन

इतिहास[संपादन]

किले नावाच्या ब्रिटिश तंत्रज्ञांनी १८७५ मध्ये शेतीची अवजारे (मोठी यंत्रे) ओढण्यासाठी जनावरांऐवजी वाफेच्या एंजिनावर चालणाऱ्या ट्रॅक्टराचा उपयोग केली. त्या वेळी नांगर वगैरे अवजारे ट्रॅक्टराला तारदोरांनी जोडीत असत. ट्रॅक्टराचा जन्म जरी अशा तऱ्हेने इंग्लंडात झाला असला, तरी त्याचा खरा विकास अमेरिकेतच झाला.

तेथे विपुल जमीन असल्यामुळे शेती उद्योगाच्या यांत्रिकीकरणाला खुपच वाव होता. अमेरिकेत शेतकामाची यंत्रे, उदा., झोडणी, मळणी, कोळपणी, लाकूड कापणी (शेती उद्योगातील उपांग) करणारी यंत्रे सु. १८५० पासून वापरात येऊ लागली. ती एकाच जागी मालकाच्या शेतात असत. वर उल्लेखिलेला वाफ एंजिनाचा ट्रॅक्टर आल्यावर तो मग घोडे लावून यंत्र असलेल्या ठिकाणी नेण्यात येत असे व ट्रॅक्टराची कप्पी यंत्राच्या कप्पीला पट्ट्याने फिरवी.

द्धतीचा गव्हाच्या शेतीला अमेरिकेत त्या वेळी फार उपयोग झाला. काही दिवासांनी या ट्रॅक्टराला गाड्यावर बसवण्यात आले व तो ओढून नेण्यासाठी घोडे अनावश्यक झाले. बांधलेले रस्ते किंवा रूळ न लागणाऱ्या ट्रॅक्टरांनी जेव्हा जमीन नांगरण्यात येऊन लागली तेव्हा ‘ट्रॅक्टर’ शब्दाचा जन्म झाला.

. त्या वेळी ट्रॅक्टराची चाके पोलादाची असत आणि जमिनीत पकड मिळवण्यासाठी त्यांच्या प्रधींवर (कडांवर) कंगोरे ठेवलेले असत (आ. १).

Back to top button