Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारडून 2 हजार रुपये कधी जाणार? कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून महत्त्वाची अपडेट

Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारडून 2 हजार रुपये कधी जाणार? कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून महत्त्वाची अपडेट

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेविषयी महत्त्वाची माहिती दिली. या योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर दाखल व्हावा यासाठी वरिष्ठ पातळीवर महत्त्वाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

राज्य सरकारडून 2 हजार रुपये कधी जाणार?

👇👇👇

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून महत्त्वाची अपडेट

 

‘त्या’ 12 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी मुदतवाढ
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून विविध अडचणीमुळे वंचित राहिलेल्या 12 लाख शेतकऱ्यांचा पीएम किसान आणि नमो महा महासन्मान योजनेत समावेश करण्यात यावा यासाठी राज्य शासनाने गाव पातळीवर कृषी, महसूल आणि भूमिअभिलेख विभागाच्या मार्फत एकत्रित विशेष मोहीम सुरू केली होती. त्यांतर्गत आतापर्यंत 4 लाख शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी दुरुस्त करून आवश्यक अटींची पूर्तता केली आहे.

भूमिअभिलेख अद्ययावत करणे, ई-केवायसी करणे, आधार बँक खात्यास संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी केले आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहीमेस आणखी 7 दिवस मुदतवाढ देण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

Back to top button