Namo Shetkari Samman Nidhi Yojana 2023

Namo Shetkari Samman Nidhi Yojana 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नमो शेतकरी महा सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली.

शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींकडून प्रत्येकी 2 हजार रुपयांचा हप्ता मिळेले. याचाच अर्थ प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4 हजार रुपये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी हा खरंतर खूप दिलासादायक निर्णय आहे. पण राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी नेमकं कसा अर्ज करावा लागेल? याबाबतची अधिकृत माहिती सध्यातरी राज्य सरकारडून सविस्तरपणे जारी करण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक-दोन वाक्यात माहिती दिली आहे.

Namo Shetkari Samman Nidhi Yojana 2023: खुशखबर..! पीएम किसानला 6000 ऐवजी 12,000 रुपये, येथून ऑनलाइन अर्ज करा

 

शेतकऱ्यांना जसे केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात अगदी तसेच पैसे राज्य सरकारकडूनही त्याचवेळी मिळतील. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकाचवेळी ते पैसे जमा होतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

Back to top button