mazi kanya bhagyashree scheme 2023: १ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या मुलींच्या बँक खात्यावर एक लाख मिळणार

mazi kanya bhagyashree scheme 2023: १ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या मुलींच्या बँक खात्यावर एक लाख मिळणार

 

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी (Documents):

  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • रेशनिंग कार्ड
  • सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
  • लाभार्थी मुलींचे आधार कार्ड

सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्याची कार्य पध्दती
सदर योजनेंतर्गत, लाभासाठी मुलीच्या पालकांनी, मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामीण व नागरी क्षेत्रातील संबंधीत स्थानिक स्वराज्य
संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र–अ० किंवा -ब० मध्ये (जे लागू असेल ते) अर्ज सादर करावा.
अर्जासोबत उपरोक्त अटी व शर्ती नुसार नमूद दस्तऐवज सादर करण्यात यावेत. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज,
राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद,
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील.
अंगणवाडी सेविकेने संबंधीत लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावा (गरजेप्रमाणे लाभार्थ्यांस अर्ज भरण्यास मदत करावी)

सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा.

अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांनी, सदर अर्जाची व प्रमाणत्रांची छाननी / तपासणी करुन प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण
क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थामधील अनाथ बालकांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
यांनी महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद, यांना एकत्रित यादी मान्यतेसाठी सादर करावी.
महिला व बाल विकास अधिकारी (जिल्हा परिषद) यांनी योग्य ती छाननी करुन यादीस मान्यता देऊन बँकेस सादर करावी.
बालगृह/शिशुगृह किंवा महिला व बाल विकास विभागातंर्गतच्या इतर निवासी संस्थामधील अनाथ मुलींबाबत लाभ मिळण्यासाठी अर्ज
सादर करण्या आधी संबधित बाल कल्याण समिती यांचे मुलगी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र संबधित संस्थानी प्राप्त करून घेऊन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

शासन निर्णय डाउनलोड – Download

माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज डाउनलोड – Download

 

Back to top button