Lek ladki Yojana

Lek ladki Yojana

 राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. यामध्ये ‘लेक लाडकी’ ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी खूषखबर..!आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे झाले सोपे,

शासनाकडून ही महत्वाची अट झाली रद्द.

त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेचे सभागृहातील सदस्यांनी बाकं वाजवून स्वागत केले

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇

Back to top button