Land Record Download

Land Record Download

 

Land Record Download आता या वेबसाईटवर जुने अभिलेख (फेरफार, सातबारा व खाते उतारे) असे पाहा…

aapleabhilekh.mahabhumi.gov.in सर्च करा.

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.

या पेजवरील ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records (Archived Documents) या पर्यायावर केल्यावर “महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’चे पेज समोर येईल.

त्यात उजवीकडील ‘भाषा’ पर्यायावर क्लिक करून भाषा निवडा.

त्यानंतर डाव्या बाजूच्या चौकटी “लॉगइन’ व ‘मदत’ ऑप्शन येईल. तुम्ही वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून

साईटवर जाऊ शकता. नोंदणी केली नसेल “नवीन वापरकर्ता नोंदणी’वर क्लिक करा

त्यानंतर या पेजवरील वैयक्तिक माहिती भरा जसे की तुमचं नाव, मधलं नाव, आडनाव, लिंग, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर आदी माहिती भरा.

त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता, मेल आयडी, बर्थ डेट ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्त्याविषयीचे रकाने भरा.

यानंतर लॉग इन आयडी तयार वेबसाईटच्या निर्देशानुसार लॉग इन आयडी तयार करा. निर्देशानुसार पासवर्ड टाका.

त्यानंतर एका चौकटीतील कुठल्याही

एका प्रश्नाचं उत्तर द्या.

त्यानंतर पुढील चौकटीत दिलेली अक्षरे जसेच्या तसे

Captcha चौकटीत टाईप करा. मग शेवटी सबमिट बटण दाबा.

त्यानंतर स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा व लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल.

यावरील “इथे क्लिक करा’वर क्लिक करा.

आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं युजरनेम आणि पासवर्ड वापरून परत लॉग इन करा.

असा पाहा फेरफार उतारा…

 

वेबसाईटवर सात जिल्ह्यांपैकी एक जिल्हा निवडा. पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा, आठ-अ असे पर्याय निवडा.असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.

यानंतर गट क्रमांक टाका व ‘शोध’ या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.

फेरफाराचं वर्ष, क्रमांक दिलेला असतो. त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहा.

त्यानंतर पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुमचं कार्ट ओपन होईल. त्याखाली असलेल्या “पुढे जा’ या पर्यायावर क्लिक केलं की “डाउनलोड सारांश’ पेज ओपन होईल.

इथं ” तुमच्या फाइलची सद्य:स्थिती उपलब्ध आहे’ असे दिसेल.

त्यासमोरील “फाइल पाहा’ या पर्यायावर क्लिक केलं की फेरफार पत्रक ओपन होईल.

Back to top button