Kharip Season 2023 शेतकरी बांधवांनो बियाणे, खते खरेदी करताय

Kharip Season 2023 शेतकरी बांधवांनो बियाणे, खते खरेदी करताय, बियाणे, कीटकनाशके आणि खतांची खरेदी करताना ही काळजी घ्या, स्वतःचे नुकसान टाळा.

 

शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामामध्ये कोणती विशेष काळजी घ्यावी या संदर्भात कृषी विभागाने देखील महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत.

1. शेतकरी बांधवांनी बियाणे तसेच खते व कीटकनाशके यांची खरेदी ही केवळ पक्क्या पावती सह खरेदी करावी. म्हणजेच जर एखादा विक्रेता तुम्हाला पक्के बिल देण्यास टाळाटाळ करत असेल तर त्या ठिकाणी खरेदी करू नये.

2. खरेदी केलेल्या पावतीवर विक्रेत्याचा मोबाईल नंबर तसेच विक्रेत्याची स्वाक्षरी अवश्य घ्यावी.

3. शेतकऱ्यांनी जी बियाणे किंवा औषधे खरेदी केलेली आहे, त्या बियाण्यांच्या वेष्टन किंवा पिशव्या त्याचबरोबर काही टॅग असेल तर ते शेतातील पीक निघेपर्यंत तसेच जपून ठेवावे.

4. तसेच खरेदी केलेल्या वस्तूंची पावती सुद्धा जपून ठेवावी.

5. शेतकरी जे बियाणे किंवा खते खरेदी करत आहे त्यांच्या पिशव्या सीलबंद असेल तरच घ्याव्या कारण की सील बंद नसेल तर त्यामध्ये भेसळण्याची शक्यता असू शकते.

कुसुम सौर पंप योजनेच्या 2 लाख सौर पंपांसाठी अर्ज सुरू

कुसुम सौर योजनेसाठी कोटा शिल्लक तात्काळ ऑनलाईन अर्ज करा

Back to top button